Quick contact info

icon_widget_image Sunday-Friday: 9am to 5pm; Saturday: Closed icon_widget_image Metaforge Engineering (I) Pvt. Ltd S.No. 22/3, Nasik- Dindori Road, Mhasrul, Nasik-422004, INDIA icon_widget_image +91-253-2531585 +91-253-2530506 icon_widget_image mktg@metaforgeindia.com

Metaforge

Learning from Failure !

आयुष्यातली मजा चढ उतारातच आहे. जेंव्हा आपण यश कमवत असतो तेंव्हा ते सर्वांचे असते. पण जेंव्हा अपयश येते, तेंव्हा ते बऱ्याचदा एकट्याने झेलावे लागते. गटांगळ्या खाताना मग कुणाचा तरी टेकू मिळतो व आपण स्थिरावतो; अनुभव मिळतो; शिकतो .. परत उंच भरारी घ्यायला सज्ज होतो. Failures मधून काही बोध मिळतो व लगेच पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतो.

लहानपणी तिसरी – चौथी पर्यंत मी अभ्यासात खूप चांगला होतो. पुढे काय झाले कळले नाही.. अभ्यासाची एकदम बोंब. प्रगती पुस्तकावरील लाल रेषा दिसल्यामुळे वडील चिंतेत. आई-वडील हे मुलगा कितीही चुकत असला तरी खूप आशावादी असतात. माझे काय चुकले हे त्यांनी शोधून त्यावर मार्ग काढत मला परत योग्य मार्गावर आणले.

लहानपणापासूनच वडिलांबद्दल प्रचंड आदर. मी बारावीत असतांना सर्व पातळीवर अडचणी येत होत्या. अपयश येत होते. कारखाना म्हसरूळला हलवावा म्हणून तगादा, कामगारांच्या अडचणी, बॅंकेकडून ताकीद, पैशाची चणचण, कोर्टात बॅंकेची रिकव्हरीची केस, कस्टमर ऐकायला तयार नाहीत, मोठा बंगला सोडून भाड्याच्या फ्लॅटमध्ये रहायला जावे लागणे, पार्टनर्सनी सोडलेली साथ, त्यात तब्येतीची कुरबुर ! पण ते खूप आशावादी होते. अगम्य विश्वास होता की यातून आपली सुटका होणार. तशी ती झालीही. यातून मला मात्र आयुष्यभरासाठी खूप काही धडे मिळाले … बॅंक निवडताना ती सहकार्य करणारी असावी; Stocks योग्य प्रमाणात व कमीतकमी असावेत; व्याजाचे गणित नेहमी डोळ्यासमोर असावे; कर्ज घेतांना ते आपल्याला पेलवेल का याचा विचार व्हावा; एक पर्याय चुकला तर दुसरा पर्याय समोर असावा; पैसा विचारपूर्वक वापरला जावा; कर्ज व विक्री यात योग्य ते प्रमाण असावे… अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या व याच्या जोरावर पुढील वाटचाल सुरु झाली.

पुढे कारखान्यात चुका झाल्याच नाही असे काही नाही. मागे युरोपला एका फोर्जिंग मशिन बनवण्याऱ्या कंपनीत भेट दिली. तेंव्हाच ठरवले की या कंपनीचे एकतरी मशिन आणायचेच. नवीन मशिन खूप महाग होते. त्या कंपनीचे एक जुने मशिन बाहेरून आणले. त्या कंपनीचे मशिन आपल्याकडे पाहिजेच असे खूप वाटत होते म्हणून .. म्हणजे जरा भावनेच्या भरात ! निर्णय चुकला. आता ते कमी किमतीत विकावे लागले. बोध मिळाला .. भावना व गरज या धंद्यात वेगळ्याच ठेवल्या पाहिजेत.

नवीन कस्टमर आला की आनंद होतो; पण पुण्यातील एका अश्याच कस्टमरनी पैसे बुडवले. मटेरियलचा पुरवठा केला पण नंतर कंपनी बॅकरप्ट झाली. खूप प्रयत्न केले पण पैसे मिळू शकले नाही…. आता नवीन कस्टमर आल्यावर GST पोर्टलवर त्याची माहिती तपासतो. मार्केटमध्ये चौकशी करतो. GST वेळेत भरणारा कस्टमर असेल तर निदान आपले पैसे मिळायची शक्यता जास्त आहे… लहानमोठे प्रसंग येतच असतात. प्रत्येक अपयशात काहीतरी शिकायला मिळते हे नक्की.

आयुष्य सरळ नसतेच, किंबहुना नसावेच. अपयशाला सामोरे गेल्यावर प्रगतीचा मार्ग दिसू लागतो. यातून योग्य तो बोध घेवून उसळी मारत परत पूर्वपदास येण्याची क्षमता आपल्यात नक्कीच आहे. ती क्षमता जो दाखवतो तो एक पाऊल पुढे जातो. Failure is an opportunity to learn and grow !

Comments

  • Hi, this is a comment.
    To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
    Commenter avatars come from Gravatar.

    reply to

Post a Comment